तुम्ही इंजिनिअरिंग, डिप्लोमा किंवा ITI केलेले आहात का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! Airport Authority of India (AAI) मध्ये अप्रेंटिस पदांसाठी १९७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
ही भरती पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी असून, पात्र उमेदवारांनी ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.
पदाचे नाव | जागा |
---|---|
पदवीधर अप्रेंटिस | 33 |
डिप्लोमा अप्रेंटिस | 96 |
ट्रेड अप्रेंटिस | 68 |
एकूण | 197 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पदवीधर अप्रेंटिस | AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण वेळ चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी. |
डिप्लोमा अप्रेंटिस | AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण वेळ तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा. |
ट्रेड अप्रेंटिस | NCVT मान्यताप्राप्त ITI सर्टिफिकेट संबंधित ट्रेडमध्ये. |
टीप: सविस्तर माहिती आणि शाखा तपशीलांसाठी मूळ जाहिरात वाचावी.
पदाचे नाव | वेतन |
---|---|
पदवीधर अप्रेंटिस | ₹15,000/- (₹10,500/- + ₹4,500/-) |
डिप्लोमा अप्रेंटिस | ₹12,000/- (₹8,000/- + ₹4,000/-) |
ट्रेड अप्रेंटिस | ₹9,000/- (पूर्णतः AAI मार्फत) |
सर्वप्रथम उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्यासाठी योग्य लिंकवर क्लिक करा (खाली दिल्या आहेत).
सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती व्यवस्थित भरावी.
फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ ऑगस्ट २०२५
📑 PDF जाहिरात वाचण्यासाठी:
👉 येथे क्लिक करा
✍️ ऑनलाईन अर्ज (डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस):
👉 येथे अर्ज करा
✍️ ऑनलाईन अर्ज (ट्रेड अप्रेंटिस):
👉 येथे अर्ज करा
🌐 अधिकृत वेबसाईट:
https://www.aai.aero/
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या मित्र-मैत्रिणींनो, ही एक उत्तम संधी आहे. AAI सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल.